बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव व सांस्कृतिक कार्यक्रमाची फॅशन शो, बॉडी बिल्डिंग स्पर्धेने यशस्वी सांगता झाली.

बेळगाव येथील राष्ट्रीय महामार्गावरील मालिनी सिटी मैदानावर गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला .या कार्यक्रमात राज्यातील हजारो नागरिकांनी सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.
शेवटच्या दिवशी शहर व जिल्ह्यातील बॉडी बिल्डर्सनी ५५ ते ९० किलो वजनी गटाच्या स्पर्धेत भाग घेऊन आपल्या पिळदार शरीरयष्टीचे प्रदर्शन केले . बेळगाव बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या वतीने आमदार अभय पाटील यांचा सत्कार करण्यात आला .तर आ . अभय पाटील यांनी अमित जडे यांचा सत्कार केला

यावेळी आमदार अभय पाटील यांनी बोलतांना सांगितले की, बेळगावच्या राष्ट्रीय महामार्गावरील मालिनी सिटी मैदानावर गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाच्या कार्यक्रमाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.त्यासाठी आपण खेळाडू आणि उत्साही तरुणांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. .

माजी मिस्टर इंडिया सुनिल आपटेकर यांनी सांगितले की, आमदार अभय पाटील यांनी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवातील , बॉडी बिल्डिंग, फॅशन शोमध्ये तरुण उत्साही तरुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सहभाग घेतला आहे.
फॅशन शोमध्ये , मिस उमंग संजना करोशी, मिस्टर उमंग हरिदर रेणके, मिस उमंग रनर अप प्रियांका कोलकर , , मिस्टर उमंग रनर अप संतोष अनेकरे यांची निवड करण्यात आली.
बॉडी बिल्डिंग स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट पोझर म्हणून विनोद मेत्री, उपविजेता म्हणून केदार पाटील आणि विजेतेपद म्हणून प्रशांत कन्नुरकर यांनी पटकावले . विजेत्यांचा आमदार अभय पाटील व मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. नांगर
कडाक्याच्या थंडीत बेळगावातील लोकांनी बॉडी बिल्डिंग,फॅशन शो, आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.


Recent Comments