Belagavi

मारुती गल्लीतील स्टेशनरी दुकानाला आग

Share

बेळगाव शहरातील एका दुकानाला रात्री आग लागून मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्या. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे .

शहरातील मारुती गल्ली येथील स्टेशनरी दुकानाला रात्री उशिरा अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले.दुकानातील लाखोंचे साहित्य जळून खाक झाले.पार्किंगसाठी राखीव असलेल्या तळघरात व्यवसाय करणाऱ्या स्टेशनरी दुकानाला अचानक आग लागली.

स्थानिकांनी तत्काळ आगीची माहिती अग्निशामक दलाला दिली आणि आग शेजारच्या दुकानांमध्ये पसरू नये म्हणून काळजी घेतली. अग्निशामक डाळीच्या जवानांनी घटनास्थळी पोचून आगीवर नियंत्रण मिळवले . खडेबाजार पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत ही घटना घडली.

Tags: