Banglore

न्याय यात्रेत अडथळे आणून लोकशाहीचा आवाज दडपण्याचा प्रयत्न : डीकेशी

Share

देशातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या राहुल गांधी यांच्या यात्रेत अडथळा आणून लोकशाहीचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केला.

बेंगळुर येथील फ्रीडम पार्क येथे शिवकुमार प्रसारमाध्यमांशी बोलत होते. देशातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसच्या अन्याय यात्रेत अडथळा आणून लोकशाहीचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे हे निंदनीय आहे. आमचे नेते राहुल गांधी यांनी घेतलेला निर्णय ही काँग्रेस पक्षाची बांधिलकी आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी काढलेल्या दांडियात्रेने ज्याप्रमाणे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला नवी दिशा दिली, त्याचप्रमाणे आपली भारत जोडो न्याय यात्रा भारतातील जनतेच्या न्यायाच्या लढ्याला बळ देईल.

आमच्या ऐतिहासिक यात्रेत अडथळे आणणाऱ्या आसाम सरकार, मुख्यमंत्री आणि भाजप कार्यकर्त्यांना मी एवढेच सांगेन की, तुम्ही जरूर दादागिरी करा, आमचे काँग्रेस कार्यकर्ते धमक्या आणि खटल्यांना घाबरत नाहीत. अन्यायाविरुद्ध निघणारी ही यात्रा यशस्वी होईल, असा दावा त्यांनी केला.

भाजपच्या जय श्री राम घोषणेबद्दल बोलताना अयोध्या, श्री राम केवळ भाजपचाच नाही तर सर्वांचा आहे, असा हल्लाबोल डीकेशिनी भाजपवर केला.

Tags: