अयोध्येत श्री रामलल्लाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर माजी सैनिकांनी बेळगाव तालुक्यातील सांबरा येथे श्रीराम प्रतिमेची भव्य सवाद्य मिरवणूक काढली.
अयोध्येत श्रीराम मंदिरात सोमवारी श्री रामलल्लाच्या मूर्ती प्रतिष्ठापना शानदार समारंभात झाली. यानिमित्त देशभरात विविध उपक्रम, मिरवणूका काढण्यात आल्या. त्याचप्रमाणे बेळगाव तालुक्यातील सांबरा येथे ‘रक्षक’ या माजी सैनिकांच्या संघटनेच्या वतीने श्रीराम प्रतिमेची भव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. टाळ-मृदंगाच्या गजरात भजन-कीर्तन आणि श्रीरामाची भक्तीगीते गात वारकरी, माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय व ग्रामस्थ या भव्य मिरवणुकीत सहभागी झाले होते.
अनेक महिला जलकुंभ डोक्यावर घेऊन या मिरवणुकीत भक्तिभावाने सहभागी झाल्या होत्या. खुल्या जीपमध्ये श्रीराम आणि अयोध्या श्रीराम मंदिराची प्रतिमा ठेवण्यात आली होती. माजी सैनिक विशेष गणवेशात या मिरवणुकीत सहभागी झाले होते. या भक्तिमय मिरवणुकीमळे सांबरा गावात एक वेगळेच चैतन्यमयी वातावरण निर्माण झाले होते.


Recent Comments