Belagavi

बेळगावात श्रीराम इनोव्हेशनच्या तिसऱ्या शाखेचे शानदार उदघाटन

Share

घरकुलांना लागणारे सर्व साहित्य एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याच्या हेतूने श्रीराम इनोव्हेशन या भव्य शोरुमचे बेळगावातील अंजनेय नगरातील जंबगी स्क्वेअरमध्ये श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेच्या शुभमुहूर्तावर शानदार समारंभात उदघाटन करण्यात आले.

होय, भव्य महानगरांप्रमाणेच बेळगाव शहराचाही विस्तार आता वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात घरे, फ्लॅट्स उपलब्ध करून देण्यासाठी शहरात व उपनगरात भव्य निवासी संकुल प्रकल्प साकारले जात आहेत. या आधुनिक घरकुलांना लागणाऱ्या डोअर लॉक, किचन साहित्य, बाथरूम फिटिंग्ज, सॅनीटीवियर्स, व्हिनीयर्स, बिल्डिंग मटेरियल्स, हार्डवेअर, कलर, किचन ट्रॉलीज, फॅन्सी डोअर्स, केबिन फिटिंग्ज, वुडन प्लाय आदी आधुनिक पद्धतीचे साहित्य ग्राहकांना या ‘श्रीराम इनोव्हेशन्स’मध्ये एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आले आहे.

संचालक सचिन हंगिरगेकर यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या ‘श्रीराम इनोव्हेशन’च्या अंजनेय नगरातील तिसऱ्या शाखेच्या शोरुमचे उदघाटन बेळगाव आर्किटेक्ट असोसिएशनचे चेअरमन व कर्नाटक स्टेट आर्किटेक्ट असोसिएशनचे सदस्य कुलदीप हंगिरगेकर यांच्याहस्ते दीप प्रज्वलन व फीत सोडून करण्यात आले. यावेळी बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सी. सी. होंडदकट्टी, कर्नाटक क्रेडाईचे सदस्य व नामवंत बिल्डर राजेंद्र मुतगेकर, श्रीराम इनोव्हेशनचे मालक सचिन हंगिरगेकर, पूनम हंगिरगेकर, संजय चंदगडकर आदी उपस्थित होते.

यावेळी ‘इन न्यूज’सोबत बोलताना श्रीराम इनोव्हेशनचे मालक सचिन हंगिरगेकर म्हणाले की, 2019 मध्ये आम्ही श्रीराम इनोव्हेशनची पहिली शाखा महात्मा फुले रोड, शहापूर येथे सुरु केली. इंटिरिअरशी संबंधित सर्व दर्जेदार, गुणवत्तापूर्ण साहित्य एकाच छताखाली माफक दरात उपलब्ध करून दिल्याने ग्राहकांकडून बेळगावात अन्य ठिकाणीही शाखा सुरु करण्याची मागणी होऊ लागली. त्यामुळे गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये गणेशपूर येथे दुसरी शाखा सुरु करण्यात आली. त्यानंतर आज अंजनेय नगरातील जंबगी स्क्वेअरमध्ये तिसरी शाखा सुरु करीत आहोत. आमच्या या शोरूममध्ये गोदरेज लॉक, किचन्स, जॉली कंपनीचे लॉक, विविध प्रकारचे इंजीस, व्हरायटी कॅबिनेट डोअर्स, हँडल्स, सक्षम, मनीलॅम्प, टायमेक्स प्लाय, व्हिनिअर्स, टायमेक्स नॅचरल, हिंडवेअर सॅनिटरी, कोर्सा बाथ फिटिंग्ज आदी नामवंत कंपन्यांचे दर्जेदार साहित्य माफक दरात एकाच छताखाली उपलब्ध करून दिले आहे. बेळगावकरांनी एकदा आमच्या शोरूमला अवश्य भेट देऊन खरेदी करावी अशी विनंती त्यांनी केली.

यावेळी बोलताना कर्नाटक क्रेडाईचे सदस्य व नामवंत बिल्डर राजेंद्र मुतगेकर म्हणाले की, बेळगावात सचिन हंगिरगेकर यांच्या श्रीराम इनोव्हेशनच्या तिसऱ्या शाखेचे आज अंजनेय नगरात उदघाटन होतेय ही आनंदाची बाब आहे. त्यांचे आणि आमचे गेल्या 25-30 वर्षांपासून व्यावसायिक संबंध आहेत. बिल्डर या नात्याने आम्ही भरपूर प्रोजेक्ट्मध्ये त्यांचे साहित्य वापरले आहे. हार्डवेअरच्या सर्व रेंजमध्ये अतिशय कलात्मक व चांगली मांडणी केलेली त्यांची बेळगावातील ही एकमेव शोरूम आहे. त्यांचा स्वभाव व वागणे चांगले आहे. त्यांनी या तिसऱ्या शोरूमच्या माध्यमातून व्यवसायात घेतलेली ही गरुडझेप आहे. त्यांनी बेळगावकरांना अशाचप्रकारे नाविन्यपूर्ण साहित्य उपलब्ध करून द्यावे आणि त्यांच्या व्यवसायाचा आणखी विस्तार, प्रगती होवो अशा शुभेच्छा मुतगेकर यांनी दिल्या.

बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीजचे अध्यक्ष सी. सी. होंडदकट्टी यांनी, श्रीराम इनोव्हेशनचे मालक सचिन हंगिरगेकर यांनी नावाप्रमाणेच आपल्या व्यवसायात इनोव्हेशन अर्थात नावीन्य आणून सचोटीने व्यवसाय केल्याबद्दल अभिनंदन केले. खरे तर त्यांची ही चौथी शाखा आहे. सर्वात आधी त्यांनी रविवारपेठ येथे श्रीराम हार्डवेअर या नावाने पहिली शाखा सुरु केली होती. बेळगावकरांना दर्जेदार साहित्य पुरवठा करून त्यांनी व्यवसायात प्रगती साधली आहे. भविष्यातही त्यांनी अशाचप्रकारे व्यावसायिक प्रगती साधावी अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

बेळगाव आर्किटेक्ट असोसिएशनचे चेअरमन कुलदीप हंगिरगेकर यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेच्या शुभेच्छा देऊन सांगितले की, आजच्या पवित्रदिनी सचिन हंगिरगेकर यांच्या श्रीराम इनोव्हेशन या बेळगावातील तिसऱ्या शोरुमचे उदघाटन होत आहे ही निश्चितच आनंदाची बाब आहे. यापूर्वी इंटेरियर मटेरियलसाठी आम्हाला मुंबईला जावे लागत असे. पण त्यांनी मुंबईच्या माफक दरातच बेळगावकरांना दर्जेदार नाविन्यपूर्ण साहित्य उपलब्ध करून देऊन ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. त्यांची उत्तरोत्तर अशीच प्रगती व्हावी अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

यावेळी गोदरेज कंपनीचे प्रतिनिधी अब्दुलकादर मकानदार, अमुल्या मायाक्का कंपनीचे विजय शेट्टर, मनीगोल्ड प्लायवूडचे आशिष अरोरा, सुनील पवार, श्रीकांत कासार यांच्यासह मान्यवर व कर्मचारीवर्ग उपस्थित होता.

एकंदर, श्रीराम इनोव्हेशनच्या तिसऱ्या शाखेची स्थापना करून सचिन हंगिरगेकर यांनी बेळगावातील अंजनेय नगर व परिसरातील ग्राहकांची एकाच छताखाली सर्व साहित्य मिळण्याची चांगली सोय केली आहे. तुम्हीही एकदा या भव्य शोरूमला भेट देऊन तुमच्या घरकुलाला लागणारे मनपसंद साहित्य खरेदी करून आनंद लुटा.

Tags: