Belagavi

एनपीएस एम्प्लॉईज युनियनकडून बेळगावात निदर्शने

Share

नवी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी एनपीएस कर्मचाऱ्यांनी बेळगावात आंदोलन केले.

बेळगाव येथील आंबेडकर उद्यानात रविवारी एनपीएस कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी डॉ. आबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले.

यावेळी बोलताना एनपीएस एम्प्लॉईज युनियनचे जिल्हाध्यक्ष एन.टी. लोकेश यांनी सांगितले की, आज राज्यभरातील 240 तालुक्यांमध्ये आणि बेळगाव जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये ओपीएस जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी आम्ही आंदोलन करत आहोत. कॉंग्रेसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात एनपीएस रद्द करून ओपीएस लागू करण्याचे आश्वासन दिले होते. त्याची अंमलबजावणी व्हावी, 18 जानेवारीला होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री घोषणा करतील, अशी अपेक्षा होती. मात्र त्यादिवशी त्यांनी निर्णय घेतला नाही, आपल्या शब्दावर खरा असलेले नेते म्हणून आम्ही सिद्धरामय्या यांच्यावर विश्वास टाकला आहे. जिल्ह्यातील 40 हजार कर्मचार्‍यांच्या वतीने एनपीएस रद्द करून ओपीएस लागू करण्यासाठी आम्ही सरकारला आवाहन करत आहोत.

एनपीएसच्या महिला कर्मचारी राजम्मा यांनी महिला कर्मचाऱ्यांच्या वतीने बोलताना, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना एनपीएस रद्द करण्याची आणि राज्य सरकारने जाहीरनाम्यात घोषित केल्यानुसार ओपीएस लागू करण्याची विनंती केली.  यावेळी एनपीएस एम्प्लॉईज युनियनचे सदस्य उपस्थित होते.

Tags: