Belagavi

आ. अभय पाटील आयोजित अंतर्राष्ट्री पतंग महोत्सवाला प्रारंभ

Share

बेळगावच्या नभांगणात आज विविध आकारांचे, विविध रंगी मनमोहक पतंग उडताना पहायला मिळाले. निमित्त होते, येडियुरप्पा मार्गावरील मालिनी सिटी मैदानावर बहुप्रतीक्षित 14 व्या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे! निरनिराळे पतंग आकाशात उडाले आणि ते पाहून गर्दीचे डोळे दीपावले. मुलांप्रमाणे मोठ्यांनीही विविधरंगी पतंग उडवून आनंद लुटला. ल्याप्रमाणे नाचले आणि ओरडले. त्याची झलक येथे पाहूया

कुंदानगरी बेळगाव येथे 14व्या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाला आज दिमाखदारपणे प्रारंभ झाला. बेळगावचे विकासाचे प्रणेते दक्षिणचे आमदार अभय पाटील हे 14 सलग वर्षांपासून याचे आयोजन करत आहेत. यंदाच्या पतंग महोत्सवाचे उद्घाटन महापालिकेच्या महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील यांच्यासह नगरसेवकांच्या उपस्थितीत पार पडले.

यावेळच्या पतंग महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार असल्याने त्याची झलक पहायला मिळाली. भगवान श्रीरामाच्या जन्म, इतिहासाची पार्श्वभूमी सांगणारे पतंग उडवण्यात आले.
देश-विदेशातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील पतंगबाजांनी पतंगबाजी करताना स्वतःचे कौशल्य आणि चातुर्य दाखवले. वाऱ्याच्या वेगानुसार पतंगाची चाल ठरत होती.

पतंग महोत्सवाबाबत माहिती देताना आमदार अभय पाटील म्हणाले की, आजपासून 4 दिवस 14 व्या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पतंग महोत्सवातच युवकांसाठी उमंग फेस्टिव्हल, डीजे नाईट, बॉडी बिल्डिंग, महिला महोत्सव आणि इतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी इन न्यूजसोबत बोलताना नेदरलँडमधून आलेल्या आंतरराष्ट्रीय पतंगबाजांनी सांगितले की, ते 20 वर्षांपासून विविध देशांत आयोजित पतंग महोत्सवात सहभागी होत असून, यावेळी ते बेळगाव काईट फेस्टिव्हलमध्ये आले आहेत. पतंग बनवून उडवण्यात आम्हाला अधिक रस आहे असे त्यांनी सांगितले.

पंजाब राज्यातील वरुण चड्डा म्हणाले की, बेळगाव पतंग महोत्सवात सहभागी होण्याचा आनंद झाला, मी आयोजकांचे आभार मानू इच्छितो, श्री राम मंदिराच्या उद्घाटनावेळी पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते आणि त्यामुळे मला अधिक आनंद मिळाला. बाइट
शशिकांत सोडबाल, महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, डॉ.स्नेहा गुर्जर, सौ.प्रिया वेरणेकर, श्रीनिवास पाटील, चैतन्य कुलकर्णी, दीपक अवर्सेकर आदी यावेळी उपस्थित होते.

Tags: