स्वित्झर्लंड येथील जगप्रसिद्ध एसएफएस ग्रुपच्या मदतीने बेळगावातील महेश फाऊंडेशनच्या नवीन शाळा आणि कौशल्य केंद्रात नवीन वर्गखोलीचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला.
महेश फाउंडेशन गेल्या१५ वर्षांपासून वैद्यकीयदृष्ट्या अपंग आणि वंचित मुलांसाठी काम करत आहे. उत्कर्षा लर्निंग सेंटर ही या मुलांसाठी खास शाळा 6 वर्षांपासून कार्यरत आहे. उत्कर्षा लर्निंग सेंटर सध्या 640 मुलांना सेवा पुरवते आणि 500 हुन अधिक मुलांपर्यंत पोहोचण्याच्या महत्वाकांक्षेने महेश फाऊंडेशन नवीन शाळा आणि कौशल्यकेंद्र इमारत बांधत आहे.
एसएफएस ग्रुप हे ऍप्लिकेशन-क्रिटिकल प्रिसिजन घटक आणि असेंब्ली, मेकॅनिकल फास्टनिंग सिस्टीम, दर्जेदार टूल्स आणि लॉजिस्टिक सोल्यूशन्स यांचा जगभरातील अग्रगण्य पुरवठादार आहे. एसएफएस ग्रुप एजीमध्ये इंजिनीयर केलेले घटक, फास्टनिंग सिस्टीम्स आणि डिस्ट्रिब्युशन आणि लॉजिस्टिक्स या तीन विभागांचा समावेश आहे, जे कंपनीच्या संबंधित व्यवसाय मॉडेल्सचे प्रतिनिधित्व करतात.
एसएफएस ग्रुप हे महेश फाऊंडेशनच्या अनेक उपक्रमांचे प्रमुख समर्थक आहेत. फाऊंडेशनच्या विद्यमान सुविधेमध्ये वर्गखोल्यांचा विस्तार करण्यापासून ते रक्तपेढी आणि लघु-विज्ञान प्रयोगशाळा स्थापन करण्यापर्यंत, SFS समूहाची अतुलनीय बांधिलकी गेल्या 15 वर्षांपासून यशासाठी निर्णायक ठरली आहे. सध्या, महेश फाऊंडेशन नवीन वर्गखोल्या बांधत आहे, एसएफएस ग्रुप या सर्व मिशनमध्ये महत्वाची भूमिका बजावत आहे.

महेश फाऊंडेशनच्या न्यू स्कूल आणि स्किलसेंटर बिल्डिंगमध्ये नवीन क्लासरूमच्या उद्घाटनप्रसंगी एसएफएस ग्रुप स्वित्झर्लंडचे सीईओ जेन्सब्रू म्हणाले की, पहिली पायरी नेहमीच सर्वात कठीण आणि महत्वाची असते. 15 वर्षांपूर्वी हे महत्त्वाचे पाऊल उचलल्याबद्दल मी महेश फाऊंडेशनचे मनापासून कौतुक करतो. हा 15 वर्षांचा खडतर प्रवास खरोखरच प्रशंसनीय आहे. मला आशा आहे की एसएफएस ग्रुप आणि महेश फाऊंडेशन दोघांच्या एकत्रित कार्याने येणारा काळ हा अजून उज्ज्वल ठरेल. संस्थेसोबत कार्य करण्याचा आम्हाला आनंद होत आहे आणि हा माझ्या आयुष्यातील एक खास दिवस आहे”,
एसएफएस समुहाचे मुख्य वित्तीय अधिकारी, वोल्कर दोस्तमन यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की, “मी दीड वर्षानंतरयेथे परतलो आहे, आज महेश फाऊंडेशनने जे काही केले आहे ते पाहून मला खूप आनंद झाला. आम्हाला अभिमान आहे की आम्ही त्यांच्या कार्यांमध्ये त्यांना मदत करू शकलो आणि त्यांना सहकार्य करु शकलो.”
एसएफएस ग्रुप इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष आल्फ्रेड श्नाइडर यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले, “दिड वर्षांपुर्वी नव्याने सुरू होणार्या रक्तपेढीचे उद्घाटन करण्यासाठी मी येथे प्रथम आलो होतो. आज पुन्हा वर्गाच्या उद्घाटनासाठी येताना मला आनंद होत आहे. मी संस्थेला त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.”
युनिस्टील लिमिटेड सिंगापूरचे व्यवसाय विकास संचालक केल्विन एनजी यांनी एसएफएस समूहाच्या अधिकाऱ्यांसह भेट दिली आणि ते त्यांच्या भेटीमुळे आनंदी झाले आणि म्हणाले, “महेश फाऊंडेशनच्या कार्याने मी खरोखरच प्रभावित झालो आहे. त्यांची व्यावसायिकता आणि गरजू व्यक्तींच्या जीवनाला स्पर्श करणारे विचार खरोखरच वाखाणण्याजोगे आहेत. मुलांवर लक्ष केंद्रित करणे त्यांच्या भविष्यासाठी महत्वाचे आहे, महेश फाऊंडेशन त्यांना योग्य शिक्षण आणि योग्य संधी देत आहे. मला इथे आल्याचा आनंद आणि अभिमान आहे. यशस्वी प्रवास आणि भविष्यासाठी उदंड शुभेच्छा.”

“महेश फाऊंडेशन आणि त्यांनी केलेले काम पाहणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय क्षण आहे. मी सर्व मुलांना सांगू इच्छितो, कृपया मोठी स्वप्ने पहा आणि ती पूर्ण करा, तुमची स्वप्ने उंच असावीत. मी तुम्हा सर्वांना खूपखूप शुभेच्छा देतो” असे एसएफएस ग्रुपचे ऑटोमोटिव्ह विभागप्रमुख उर्सलॅन्गेनॉअर म्हणाले.
एसएफएस ग्रुपचे इंडिया ऑपरेशन्स डायरेक्टर प्रशांत कोरे, मेळाव्याला संबोधित करताना म्हणाले, “जेव्हाही मी येथे भेट देतो तेव्हा मला प्रेरणा मिळते. मला येथे खूपसकारात्मक ऊर्जा जाणवते. सीएसआर अंतर्गत तुमच्या उपक्रमाला पाठिंबा देण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. महेश फाऊंडेशनशी जोडल्याचा आम्हाला अभिमान आहे. जेव्हाजेव्हा महेश फाऊंडेशनला आमच्या पाठिंब्याची गरज असेल तेव्हा आम्ही तुमच्यासोबत असू”
एसएफएस ग्रुप इंडिया प्रा. लि. चे सीएफओ पारस शाह म्हणाले की, येथे येणे नेहमीच आनंददायी असते. आपल्याला येथे मिळणारी ऊर्जा आपल्याला सर्व नकारत्मकता विसरायला लावते आणि ती आपल्याला योग्य गोष्टी करण्यास प्रोत्साहन देते. महेश फाऊंडेशनने अप्रतिम काम केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छितो. तुम्ही अशक्य आणि अकल्पनीय असे काहीतरी केले आहे. खुप शुभेच्छा आणि भविष्यात सतत सहकार्याची अपेक्षा करतो.

श्रीजेन्सब्रू, सीईओ, एसएफएस ग्रुपएजी स्वित्झर्लंड, वोल्कर दोस्तमन, सीएफओ, एसएफएस ग्रुपएजी स्वित्झर्लंड, अल्फ्रेड श्नाइडर, चेअरमन, एसएफएस ग्रुप इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, उर्सलँगेनॉअर, ऑटोमोटिव्ह विभागप्रमुख, एसएफएस ग्रुपएजी स्वित्झर्लंड, कॅल्विन एनजी, डायरेक्टर, बिझनेस डेव्हलपमेंट, युनिस्टील लिमिटेड सिंगापूर, प्रशांत कोरे, डायरेक्टर ऑफ इंडिया ऑपरेशन्स, पारस शाह, एसएफएस इंडियाचे सीएफओ चंद्रकांत कुल्लोळी आणि सतीश भोसले यांचा महेश फाऊंडेशनतर्फे या कार्यक्रमावेळी गौरव करण्यात आला. यावेळी महेश फाउंडेशनची मुले, कर्मचारी, शिक्षक, स्वयंसेवक उपस्थित होते.


Recent Comments