Belagavi

माणिकबाग शोरूममध्ये टाटा कंपनीच्या पंच इलेक्ट्रिक कारचे अनावरण

Share

देशातील प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सच्या नवीन “पंच” या इलेक्ट्रिक कारचे आज बेळगावातील उद्यमबाग येथील माणिकबाग ऑटोमोबाईल शोरूम येथे अनावरण करण्यात आले.

बेळगाव आणि उत्तर कर्नाटकातील जनतेला माणिकबाग ऍटोमोबाइल्स चांगली तत्पर सेवा आणि गुणवत्तापूर्ण वाहने देत आली आहेत. शुक्रवारी बेळगावचे आरटीओ नागेश मुंडास यांच्याहस्ते या नव्या पंच कारचे लोकार्पण केले. फ्लो
यावेळी पंच कारचे लोकार्पण करून बोलताना आरटीओ नागेश मुंडास म्हणाले की, देशात अनेक नवनवीन तंत्रज्ञानायुक्त वाहने येत आहेत. त्यामुळे सर्व ग्राहकांनी आणि वाहनचालकांनी वाहतुकीचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून सुरक्षित ड्रायव्हिंग करा. टाटाचे हे नवे पंच वाहन अतिशय आकर्षक आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या सर्व सुविधा या बॅटरी ऑपरेटेड कारमध्ये आहेत. ही कार घेऊन सर्वानी सुरक्षित प्रवास करावा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बोलताना माणिकबाग ऑटोमोबाईल शोरुमचे प्रमुख शील मिर्जी म्हणाले की, माणिकबाग आणि टाटा मोटर्सने एक अत्याधुनिक इलेक्ट्रिक कार ग्राहकांसाठी आहे. यात अनेक अत्याधुनिक चांगली, आरामदायी, सेफ्टी, हाय परफॉर्मन्स अशी फीचर्स आहेत. केवळ एका चार्जींगमध्ये तुम्ही लॉन्ग ड्राइव्ह करू शकता. वापरायला अगदी इझी आहे. येत्या काळात ही कार सर्वांना आवडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आजच आमच्या शोरूमला भेट देऊन ही कार पहा असे त्यांनी सांगितले.


मॅनेजर शैलेश खटावकर यांनी या नव्या इलेक्ट्रिक वाहनाबद्दल ‘इन न्यूज’ला अधिक माहिती दिली.

या समारंभात भूषण मिर्जी, रमेश शहा, स्वप्नील शहा, टाटा मोटर्स कंपनीचे सुदर्शन साहू, कुलभूषण कुंभार, सीपीआय जे. एम. कालीमिरची उपस्थित होते. पहिल्याच दिवशी ही कार पाहण्यासाठी ग्राहकांनी माणिकबाग शोरूममध्ये मोठी गर्दी केली होती.

Tags: