Belagavi

बेळगावात दलित संघर्ष समितीचे 23 वे जिल्हा अधिवेशन, फेरी

Share

‘कर्नाटक दलित संघर्ष समिती आंबेडकर वाद’च्या वतीने संविधान समर्पण दिनाचा एक भाग म्हणून राज्यभरातील 30 जिल्ह्यांमध्ये जिल्हा अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. 23 वे जिल्हा अधिवेशन बेळगाव येथील कुमार गंधर्व सभागृहात होणार असल्याची माहिती राज्याचे दलित नेते मौली शंकर यांनी दिली.

संविधान समर्पण दिनाचा एक भाग म्हणून बेळगाव येथील आंबेडकर गार्डन येथून जनजागृती फेरी काढण्यात आली. चन्नम्मा सर्कल, कोर्ट रोड, आरटीओ सर्कल येथून निघून कुमार गंधर्व हॉल येथे या फेरीची सांगता झाली.

राज्य दलित संघर्ष समितीचे नेते मौली शंकर म्हणाले की, कर्नाटक दलित संघर्ष समिती आंबेडकर वार्डच्या वतीने संविधान समर्पण दिनाचा एक भाग म्हणून राज्यभरातील 30 जिल्ह्यात जिल्हा अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असून 23 वे जिल्हा अधिवेशन कुमार गंधर्व सभागृहात होणार आहे.

यावेळी मल्लेश चौगुले, सिद्धप्पा कांबळे, महांतेश तळवार, सुधीर चौघुले, यल्लाप्पा कोलकार, बाबू कोलकार, संतोष हलगेकर, शिवपुत्रय्या मेत्री आदींसह अनेकांची उपस्थिती होती.

Tags: