प्रकाश हुक्केरी हे सक्रिय राजकारणी आहेत. सत्तेत असो वा नसो, ते लोकांसाठी काम करत आहेत. आतापर्यंत ग्रामपंचायत सदस्यापासून मंत्रिपदापर्यंत राजकीय क्षेत्रातील अनेक पदे त्यांनी सांभाळली आहेत. त्यांच्या अन्नपूर्णेश्वरी फौंडेशनतर्फे लॅपटॉप आणि कलर प्रिंटरचे वाटप कौतुकास्पद असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले.
शहरातील अन्नपूर्णेश्वरी फौंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 88 शासकीय व अनुदानित शाळांना लॅपटॉप आणि कलर प्रिंटरचे वाटप केल्यावर बोलताना ते म्हणाले, ‘प्रकाश हुक्केरी यांनी विधान परिषदेची निवडणूक उत्तर-पश्चिम शिक्षक मतदारसंघातून लढवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी ते जिंकतील की नाही, याबाबत साशंकता होती. पण, त्यांना कसे जिंकायचे हे माहित आहे. आता शिक्षकांसाठी ते काम करत आहेत. आता आम्ही त्यांना लोकसभा निवडणूक लढवायला सांगितली आहे, अशा लोकांनी राजकारणात रहायला हवे,’ असे ते म्हणाले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग तथा जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, नगरविकास मंत्री भैरती सुरेश, शासनाचे मुख्य प्रतोद अशोक पट्टण, आमदार आसिफ सेठ, महेंद्र तम्मनवर, गणेश हुक्केरी, विधानपरिषद सदस्य नागराज यादव आदी उपस्थित होते.


Recent Comments