Belagavi

बेळगाव आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव-2024 चे काउंट डाऊन सुरु

Share

बेळगावचे उपक्रमशील आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी होणाऱ्या बहुप्रतीक्षित बेळगाव आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव-2024 चे काउंट डाऊन सुरु झाले आहे. बुधवारी बेळगावातील बी. एस. येडियुरप्पा मार्गावरील मालिनी सिटी येथे बुधवार दिनांक 20 ते 23 जानेवारी दरम्यान पतंग महोत्सवाला प्रारंभ होणार असल्याचे आमदार अभय पाटील यांनी सांगितले.

बेळगावात आज पत्रकार परिषदेत बोलताना आमदार अभय पाटील म्हणाले की, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे 10 परदेशी आणि भारतातील विविध राज्यांतील 32 पतंग उडविणारे तज्ञ या महोत्सवात सहभागी होणार आहेत. यावेळीही तरुणांसाठी उमंग उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात भाषण, वादविवाद, एकल नृत्य, समूह नृत्य, एकल गायन, मॉक प्रेझ, आणि फॅशन शो स्पर्धा आयोजित केल्या आहेत. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी डीजे नाईट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शरीरसौष्ठवप्रेमींसाठी खास शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाच्या दिवशी श्री राम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठाने निमित्त भव्य क्रॅकर शोचे आयोजन करण्यात आले होते.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी बलून फेस्टिव्हल व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. लहान मुलांसाठी सामूहिक नृत्य स्पर्धा आयोजित केली आहे. यात बेळगाव शहरातील 11 शाळांमधील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. महोत्सवाचे वेळापत्रक आणि पतंग उडविणाऱ्या तज्ञांचे तपशील संबंधितांना पाठवले आहेत. या महोत्सवामुळे बेळगावची उद्योजकता आणि पर्यटनाला आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळण्यास मदत झाली आहे. तरुण गट आणि मुलांसाठी त्यांची कला आणि प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी हे एक चांगले व्यासपीठ असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी आयोजक चैतन्य कुलकर्णी, दीपक अवसेकर आदी उपस्थित होते.

Tags: