भाजप पक्षाच्या बळकटीसाठी पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षाचे कार्य प्रामाणिकपणे निभावेन असे नव्याने नियुक्त झालेल्या बेळगाव महानगर जिल्हाध्यक्षा गीता सुतार यांनी सांगितले.
बेळगाव येथील भाजप कार्यालयात सोमवारी आयोजित अभिनंदन कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या. यावेळी बेळगावच्या महापौर शोभा सोमनाचे व उपमहापौर रेशमा पाटील, महानगर सरचिटणीस मुरुगेन्द्रगौडा पाटील, महानगरपालिका सत्तारूढ गटनेते राजशेखर डोनी, बेळगाव जिल्हा संघटनसह सचिव जयप्रकाश यावेळी उपस्थित होते.
यावेळी बेळगावच्या महापौर शोभा सोमनाचे यांनी गीता सुतार यांना पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या. नवनियुक्त महानगर भाजप अध्यक्षा गीता सुतार यांनी आपण भाजपाच्या कार्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करून पक्ष मजबूत करण्यास कटिबद्ध राहील अशी ग्वाही यावेळी दिली.
यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी नूतन महानगर जिल्हाध्यक्ष गीता सुतार यांचा पुष्पगुच्छ व मिठाई वाटून अभिनंदन केले. यावेळी माध्यम संयोजक शरद पाटील, अशोक थोरवत, शिल्पा केकरे यांच्यासह प्रमुख भाजप कार्यकर्ते व इतर उपस्थित होते.


Recent Comments