Belagavi

अमन सुनगार याची युथ गेम्ससाठी निवड

Share

सेंट पॉल्स हायस्कूलचा विध्यार्थी अमन अभिजीत सुनगार याची 27 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत चेन्नई येथे होणाऱ्या ‘खेलो इंडिया’ युथ गेम्ससाठी जलतरण खेळासाठी निवड झाली आहे.

अमन हा त्याचे प्रशिक्षक उमेश कलघटगी आणि अक्षय शेरेगार यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव जलतरण क्लब येथे प्रशिक्षण घेत आहे. बेंगळुरच्या डॉल्फिन क्लबचे प्रशिक्षक मधुकुमार एम. बी., त्याच्या शाळेचे मुख्याध्यापक फादर सेबी, अँथनी सर आणि त्याचे वडील अभिजीत सुनगार यांचे त्याला प्रोत्साहन लाभत आहे.

Tags: