वरेरकर नाट्यमंदिर, दुसऱ्या रेल्वे गेट जवळ, टिळकवाडी, बेळगाव येथे वन्यजीव छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
वन्यजीव प्रेमी किरण कुलकर्णी यांनी देश-प्रदेशातील जंगलात फिरून काढलेल्या वन्यजीवांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन टिळकवाडीतील वरेरकर नाट्य मंदिरात भरवण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन बेळगाव विभागाचे मुख्य वनसंरक्षक मंजुनाथ चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उप वनसंरक्षक एस. के. कल्लोळीकर, रोटरी क्लब ऑफ बेळगाव दक्षिणचे अध्यक्ष विजय दरगशेट्टी उपस्थित होते.
वन्य प्राण्यांबद्दलचे मिथक आणि प्राणी सुरक्षितपणे पाहण्यासाठी जंगलात कसे वागावे याविषयी किरण कुलकर्णी यांनी माहिती दिली. मुख्य वनसंरक्षक मंजुनाथ चव्हाण यांनी मानव-प्राणी संघर्षाची कारणे आणि ते कसे टाळावेत याबद्दल सांगितले. उप वनसंरक्षक एस. के. कल्लोळीकर यांनी वन आणि वन्यजीवांचे संरक्षण कसे करावे याबद्दल सांगितले. रोटरी क्लब ऑफ बेळगाव दक्षिणचे अध्यक्ष विजय दरगशेट्टी यांनी दिलेल्या देणगीचा उपयोग क्लब कसा करत आहे हे स्पष्ट केले.

या प्रदर्शनात 85 वन्यजीवांचे फोटो दाखवण्यात आले. सर्वांनी फोटो पाहून ते काढण्यासाठी किरण कुलकर्णी यांनी बाळगलेल्या संयम आणि कौशल्याची प्रशंसा केली. पहिल्याच दिवशी 150 हुन अधिक लोकांनी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली आणि प्रदर्शनातील फोटो विकत घेण्यासाठी धावपळ उडाली होती.
छायाचित्रांच्या विक्रीतून मिळणार निधी रोटरी क्लब ऑफ बेळगाव साउथला धर्मादाय कार्यासाठी देणगी म्हणून देण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर कऱण्यात आले.


Recent Comments