Belagavi

दलित संघर्ष समिती बेळगाव शाखेकडून निदर्शने

Share

रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे यांना गोकाक वनविभागाचे उप वनसंरक्षक शिवानंद नायकवडी यांना केलेल्या शाब्दिक शिवीगाळाचा निषेध करत दलित संघर्ष समितीच्या वतीने नायकवडी यांच्यावर कायदेशीर कारवाईच्या मागणीसाठी दलित संघर्ष समितीच्या जिल्हा शाखेतर्फे बेळगावात निदर्शने करण्यात आली.

रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे यांना गोकाक वनविभागाचे उप वनसंरक्षक शिवानंद नायकवडी यांनी अवमानास्पद शब्दात एकेरी उल्लेख करून अवमान केला आहे, त्याबद्दल संबंधित अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी दलित संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी केली.

याबाबत बोलताना संघटनेचे नेत्यांनी सांगितले की, दुर्योधन ऐहोळे यांना एकेरी बोलून लोकप्रतिनिधींचा अवमान केला आहे. आ. ऐहोळे यांनी जनतेच्या हिताबाबत वनाधिकाऱ्याशी चर्चा केली असता, त्यांना एकेरी बोलणाऱ्या उप वनसंरक्षक शिवानंद नायकवडी यांचा राजीनामा घ्यावा किंवा वनमंत्र्यांनी त्यांना निलंबित करावे, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी गीता सुन्नक्की, सतीश हरिजन, वीरभद्र मैलन्नावर, विठ्ठला सनक्की, बसप्पा तळवार, सुंदरव्वा कट्टीमनी, शांतव्वा वंटगुडी आदींचा सहभाग होता.

Tags: