बेळगावातील जेएमएफसी कोर्टातून आज दुपारी टिळकवाडी पोलिसांच्या नजरेतून सुटून पळून गेलेला अब्दुलगनी शेख अखेर हिरेबागेवाडी पोलिसांच्या हाती लागला आहे.
हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल बाब्बण्णा (बक्कल क्र. PC 1449) आणि नागप्पा सुतगट्टी या (बक्कल क्र. PC 1402) दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपी अब्दुलगणी याला मोमीन गल्ली, हिरेबागेवाडी येथून अटक केली आहे. आज त्याच्या विरुद्ध मार्केट स्टेशन मध्ये गुन्हा क्र. 11/2024, अन्वये 224 IPC नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर घरफोडीचे 5 गुन्हे दाखल आहेत. एपीएमसी, बेळगाव ग्रामीण, उद्यमबाग आणि टिळकवाडी पोलीस स्थानकात नोंद असलेल्या या प्रकरणात त्याची न्यायालयीन चौकशी सुरू आहे. आज दुपारी तो न्यायालय आवारातून फरारी झाला होता. त्याला पुन्हा शिताफीने अटक केल्याबद्दल बेळगावचे पोलीस आयुक्त सिद्रामप्पा यांनी पोलीस कर्मचारी बाबन्ना आणि नागाप्पा सुतगट्टी याना ५ हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे.


Recent Comments