Belagavi

सचिन हॉस्पिटलमधील बांध्यत्व निवारण शिबीर मूल नसलेल्या दाम्पत्यांसाठी वरदान

Share

मूल न झालेल्या दांपत्यांसाठी महाराष्ट्रातील मिरज येथील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्त्री रोग व वंध्यत्व निवारण मार्गदर्शन सेंटर (टेस्ट टयूब बेबी) सचिन हॉस्पिटल येथे रविवार दि. ७ जानेवारी २०२४ रोजी मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबिर पार पडले .

होय, मूल न झालेल्या दांपत्य आणि स्त्रियांसाठी महाराष्ट्रातील मिरज येथील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्त्री रोग व वंध्यत्व निवारण मार्गदर्शन सेंटर (टेस्ट टयूब बेबी) सचिन हॉस्पिटल येथे रविवार दि. ७ जानेवारी २०२४ रोजी मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबिर पार पडले . सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत झालेल्या या मोफत शिबीराचा फायदा अनेक अपत्यहीन दांपत्यांना झाला .

या शिबिरात अपत्यहीन दांपत्यांना आवश्यकतेनुसार मोफत मार्गदर्शन, सवलतीच्या दरात तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया, नामवंत तज्ज्ञ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय डॉक्टरांची टीम, औषधोपचार, आय. यु. आय. व टेस्ट ट्यूबच्या पर्यायाविषयी चर्चा, आधुनिक उपचार व तंत्रज्ञान, पुरुषांच्या तपासणीची वेगळी सोय, आधुनिक तंत्रज्ञानाने उपचार, बंद गर्भनलिका जोडण्याचे अत्याधुनिक तंत्रज्ञान, स्त्री बीज तयार न होणे व न फुटणे, गर्भाशयाच्या गाठी, गर्भाशय काढणे, गर्भ रुजू न होणे, वारंवार होणारे गर्भपात, पाळीच्या तक्रारी, पांढरे जाणे, स्त्रियांमधील कर्करोग व वजन कमी करण्याचे उपाय, पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असणे वा नसणे, पुरुष व स्त्रियांच्या लैंगिक समस्या, गुप्तरोग, इंद्रियांची समस्या, शीघ्रपतन, कमजोरी तसेच विवाहपूर्व व विवाहोत्तर समस्यांवर मार्गदर्शन करून तपासणी , मार्गदर्शन उपचार करण्यात आले .

आंतरराष्ट्रीय दर्जाची अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त टेस्ट ट्यूब बेबीची प्रयोगशाळा, वीर्यपेढी, स्त्रीबीजदान आदी सोयी सचिन हॉस्पिटल येथे उपलब्ध आहेत. शिबिरात सहभागी होणाऱ्या दांपत्यांना डॉ. सचिन सुगन्नावर आणि डॉ. नेहा यांनी समुपदेशन करून मार्गदर्शन केले .
या शिबिराचा लाभ अनेक अपत्यहीन दाम्पत्यांनी घेतला .

Tags: