Belagavi

खासदार मंगल अंगडी यांनी वाटल्या अयोध्या मंत्राक्षता

Share

बेळगावच्या खासदार मंगल अंगडी यांनी घरोघरी जाऊन अयोध्येच्या राम मंदिरातील मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण आणि पवित्र मंत्राक्षतांचे वाटप केले.

खासदार मंगल अंगडी यांनी बेळगावातील रुक्मिणी नगर येथील श्री अयप्पा स्वामी स्वामी मंदिरात अयोध्येतील श्री राम मंदिराच्या पवित्र मंत्राक्षतांची पूजा केली. त्यानंतर निमंत्रण व मंत्राक्षतांचे परिसरातील घरोघरी जाऊन वाटप केले. यावेळी त्यांनी 22 जानेवारी रोजी घरोघरी रामज्योती प्रज्वलित करण्याची विनंती केली.

यावेळी महापालिकेचे सत्तारूढ गटनेते राजशेखर डोनी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा कोषाध्यक्ष कृष्णा भट, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: