Belagavi

आ. दुर्योधन ऐहोळे यांचा एकेरी उल्लेख; डीएफओविरोधात आंदोलन

Share

आमदार दुर्योधन ऐहोळे यांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल गोकाकचे डीएफओ शिवानंद नायकवाडी यांना निलंबित करण्याची मागणी करत दलित संघटनांच्या नेत्यांनी गोकाक शहरात आंदोलन केले.

आमदार दुर्योधन ऐहोळे यांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल गोकाक वनसंरक्षक कार्यालयाच्या घटप्रभा विभागाचे डीएफओ शिवानंद नायकवाडी यांच्या वागणुकीचा दलित संघटनेच्या नेत्यांनी निषेध केला. कार्यालयाचा दरवाजा अडवून लोकप्रतिनिधीचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी केली.

यावेळी बोलताना दलित नेते रमेश मादार यांनी, राज्यातील सर्व 224 आमदारांत सर्वात मृदुभाषी असलेल्या आमदार दुर्योधन ऐहोळे यांचा एकेरी उल्लेख करून डीएफओ शिवानंद नायकवाडी यांनी पदाचा दर्प दाखवला आहे. त्यामुळे त्यांना वनमंत्र्यांनी निलंबित करावे अन्यथा त्यांच्यावर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू, असा संताप व्यक्त केला.

सत्ताप्पा करावडे, लक्ष्मण तेळगडे, बसवराज हनश्याळ, सतीश हरिजन आदी दलित नेत्यांनी या आंदोलनात भाग घेतला.

Tags: