Belagavi

करुणाडू विजयसेनेच्या तीन कार्यकर्त्यांची मए समितीच्या निषेधार्थ निदर्शने

Share

कन्नड नामफलकांच्या सक्तीच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने एल्गार पुकारल्यानंतर कानडी संघटनांचे धाबे दणाणले आहे. समितीच्या मागणीकडे दुर्लक्ष करावे अशी मागणी करत स्वतःसह अवघे तीन कार्यकर्ते घेऊन करुनाडू विजयसेनेच्या संपतकुमार देसाई याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरडाओरड करत निदर्शने केली.

बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्यांवर बसून करुणाडू विजयसेनेचे नेते संपतकुमार देसाई यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना करुणाडू विजयसेनेचे नेते संपत कुमार देसाई म्हणाले की, महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगावमध्ये इतके दिवस लढत आहे, सरकारने कन्नड नामफलक अनिवार्य केल्याने पुन्हा त्यांनी लढा देण्यास सुरुवात केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे निवेदन स्वीकारू नये, अशी आमची मागणी आहे. मराठी लोकांनी कन्नड पाट्या लावणाऱ्यांकडे व्यवसाय करू नये, अशी एमईएस स्वीकारायची असेल तर आधी आम्हाला गोळ्या घाला, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांनी हे समजून घेतले पाहिजे की महाराष्ट्रात 100% मराठी भाषेशिवाय इतर कोणत्याही भाषेला परवानगी नाही, राज्यात 60% कन्नड बोर्डाला परवानगी आहे.  करुणाडू विजया सेनेचे नेते संपतकुमार देसाई यांच्यासह करुणाडू विजयसेनेचे मोजून तीन कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यामुळे हे प्रसिद्धीसाठीचे आंदोलन आहे का अशी चर्चा रंगली होती.

Tags: