Belagavi

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी जवानांच्या निधनाबद्दल केला शोक व्यक्त

Share

आजारपणामुळे मरण पावलेल्या गोकाक तालुक्यातील डुम्मा उरबिनहट्टी येथील लष्करी जवान महांतेश बी. हुबळी यांच्या निधनाबद्दल मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शोक व्यक्त केला.

गोकाक तालुक्यातील डुम्मा उरबिनहट्टी येथील वीरयोद्धा महांतेश यांचे 2 दिवसांपूर्वी आजारपणामुळे दिल्लीच्या रुग्णालयात निधन झाले. या जवानाचे पार्थिव आज बेळगाव सांबरा विमानतळावर दाखल होताच मंत्र्यांनी तेथे पोहोचलेल्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला व सैनिकाच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना केली.

लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, मद्रास इंजिनीअरिंग ग्रुपच्या (एमईजी) पंजाब युनिटमध्ये कार्यरत असलेल्या शिपाई महांतेशचा इतक्या लहान वयात मृत्यू होणे दुर्दैवी आहे.

Tags: