Belagavi

सेंट मेरी शाळेत स्केटिंगपटू साईराज मेंडके याचा सत्कार

Share

बेळगावातील सेंट मेरी स्कूलमध्ये शिकत असलेला बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचा स्केटर मास्टर साईराज मेंडके हा 2 वेळा आरएसएफआय नॅशनल आणि 2 वेळा एसजीएफआय राज्य पदकविजेता ठरला आहे. त्यामुळे साईराजचा सेंट मेरी स्कूलच्या प्रांगणात गौरव करण्यात आला.

हा सत्कार सेंट मेरी स्कूलच्या प्राचार्या जस्मिन रुबडी यांच्या हस्ते झाला. यावेळी शिक्षिका मंगल पाटील, पीई शिक्षक सचिन पिल्लई, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, श्रीकांत मेंडके व अर्चना मेंडके उपस्थित होते.

Tags: