आमदार अभय पाटील यांनी टिळकवाडीतील नागझरीनाथ कॉलनीत घरोघरी जाऊन अयोध्येच्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या पवित्र मंत्राक्षतांचे वाटप केले.
अयोध्येत येत्या २२ जानेवारीला प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यानिमित्त घरोघरी निमंत्रण पत्रिका आणि पवित्र मंत्राक्षतांचे वाटप करण्यात येत आहे. बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनीही आज टिळकवाडीत हा उपक्रम राबवला.
बेळगाव दक्षिण मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 29 मधील नागझरीनाथ कॉलनी, टिळकवाडी, येथे त्यांनी घरोघरी जाऊन मंत्राक्षतांचे वाटप केले. यावेळी नगरसेवक नितीन जाधव व अन्य उपस्थित होते.


Recent Comments