22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथे श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळा तसेच श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमांतर्गत अक्षता कलशाची शाहूनगर मधील गणपती मंदिर येथे स्थापना केली
शनिवार दिनांक 6 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 5 पासून रात्री उशिरापर्यंत भव्य अशी अक्षता कलश शोभायात्रा काढण्यात आली शाहूनगर शिवमंदिर पासून साई कॉलनी येथील साई मंदिर पर्यंत तसेच साई मंदिर ते मारूती मंदिर मारुती मंदिर पासून ते गणपती मंदिर पर्यंत मिरवणुकीने हा कलश स्थापन करण्यात आला .

तेव्हा आरएसएसचे अमित जी, श्री कृष्णा भट, विश्व हिंदू परिषद जिल्हाप्रमुख श्रीकांत कदम ,उपमहापौर रेश्मा पाटील , नगरसेवक श्रेयस नाकाडी समाजसेवक प्रवीण पाटील सर्व नगरातील व वार्डातील महिला वर्ग महिला मंडळ युवक मंडळ व नगरातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते


Recent Comments