बेळगावातील हनुमान नगर ग्लास हाऊसमध्ये सामाजिक कार्यकर्त्या ज्योती बनहट्टी यांच्या वतीने विविध गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन आणि मोफत आरोग्य तपासणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
सामाजिक कार्यकर्त्या ज्योती बनहट्टी यांच्या वतीने आज मकरसंक्रांती निमित्त अनोखा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. परिसरातील नागरिकांसाठी मोफत रक्तदाब आणि मधुमेह तपासणी करण्यात आली. यासाठी लेक व्ह्यू हॉस्पिटलचे सहकार्य लाभले. हनुमाननगर व परिसरातील अनेक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. फ्लो
दरम्यान, हनुमाननगर ग्लास हाऊसमध्ये ज्योती बनहट्टी यांच्या वतीने विविध गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री मेळावाही आयोजित करण्यात आला.
या प्रदर्शनात महिला व पुरुषांचे कपडे, स्वेटर्स, खेळणी, गृहोपयोगी वस्तू, चटण्या, पापड, लोणची आदी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स मांडण्यात आले होते. ग्राहकांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.

दरम्यान, प्रदर्शनाबद्दल माहिती देताना मुत्तू यांनी सांगितले की, हॅपी ग्रेन नामक आमची संस्था असून, महिलांना त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू, उत्पादनांना स्थानिक बाजारपेठ मिळावी, त्यातून त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात या सामाजिक हेतूने आम्ही अशा प्रकारची प्रदर्शने भरवतो. ‘स्पर्श’ नामक एनजीओमधील मुलांनी तयार केलेल्या वस्तूंचाही यात समावेश असतो. त्याशिवाय ज्येष्ठ नागरिकांसाठी आज लेक व्ह्यू हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत रक्तदाब आणि मधुमेह तपासणी शिबीर घेण्यात आले. त्याचा अनेकांनी लाभ घेतला. उद्या मोफत नेत्रचिकित्सा शिबीर घेण्यात येर असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, ज्योती बनहट्टी यांनी आयोजित केलेल्या या दोन्ही उपक्रमांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला.


Recent Comments