Belagavi

काँग्रेस रोडवर भरधाव मोटरसायकल क्रेटा कारला धडकून भीषण अपघात

Share

बेळगावातील काँग्रेस रोडवर गुडनेस हेल्थ हब फार्मासमोर झालेल्या भीषण अपघातात बाईकस्वार युवक गंभीर जखमी झाला.

बेळगावातील काँग्रेस रोडवर गुडनेस हेल्थ हब फार्मासमोर आज, शनिवारी दुपारी भीषण अपघात झाला. भरधाव मोटरसायकल क्रेटा कारला धडकून ही दुर्घटना घडली. धडकेनंतर मोटरसायकल चालक युवक रस्त्याच्या पलीकडे जाऊन पडला. तर त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले.

अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. रुग्णाला वेणुग्राम रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेतून वेणुग्राम रुग्णालयात हलविण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्यांनी टिळकवाडी पोलिसांना अपघाताची माहिती दिली. या प्रकरणी वाहतूक दक्षिण पोलीस स्थानकात नोंद झाली आहे.

Tags: