बेळगावातील एसपीएम रोड, प्रकाश थिएटरसमोरील रहिवाशी शतायुषी श्रीमती लक्ष्मीबाई देवप्पा लोहार यांचे आज, गुरुवारी सकाळी 6 वाजता निधन झाले. त्या 108 वर्षांच्या होत्या.
त्यांच्या मागे 5 मुले, 3 मुली, जावई, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
श्रीमती लक्ष्मीबाई देवाप्पा लोहार यांनी ब्रिटिशांच्या काळात पतीसोबत स्वतः लोहार काम करून कष्टाने घर-संसार उभा केला. एका अर्थी त्या खऱ्या कर्मयोगी होत्या. त्या अतिशय धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या. त्यांनी कलावती आई यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना स्वतःच्या हातानी भाकरी खाऊ घातली होती.
स्वतः कष्टमय जीवन जगताना प्रामाणिकपणा व चिकाटीने नोकरी, कामधंदा करून जीवनात यश मिळवा असा उपदेश त्या सर्वाना करत. त्यामुळे एसपीएम रोड, शास्त्रीनगर परिसरात लोक त्यांना देवासारखा मान देत. त्यांच्या निधनामुळे या परिसरावर शोककळा पसरली आहे.


Recent Comments