गोकाक तालुक्याचे ग्रेड 2 तहसीलदार लक्ष्मण भोवी यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

लक्ष्मण भोवी गोकाक तहसीलदार कार्यालयात ग्रेड 2 तहसीलदार म्हणून सेवा बजावत होते. आज, बुधवारी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच गोकाक तहसीलदार कार्यालयावर शोककळा पसरली.
ईश्वर मृतांच्या आत्म्याला शांती देवो, त्यांच्या वियोगाचे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबीयांना मिळावी म्हणून सहकाऱ्यांनी प्रार्थना केली.


Recent Comments