Belagavi

बेळगावात प्लास्टिक कचऱ्याचा वापर करून रस्ता बांधकाम

Share

राज्यात प्रथमच प्लास्टिकचा वापर करून रस्ते तयार करण्याचा पर्यावरणपूरक प्रकल्प बेळगाव महापालिकेने सुरु केला आहे. नगर प्रशासन मंत्री रहीम खान आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते प्लास्टिक रस्त्यांच्या कामाचा आज मंगळवारी शुभारंभ करण्यात आला.

नगर प्रशासन मंत्री रहीम खान आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या पुढाकाराने शहरातील पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर करून रस्ते बनविण्याच्या राज्यातील पहिल्या योजनेला आज चालना देण्यात आली. यात प्लास्टिक कचऱ्याचे पावडरमध्ये रुपांतर करून त्या पावडरचा वापर करून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. प्रायोगिक पातळीवर महापालिकेसमोरील रस्त्याचे या पद्धतीने डांबरीकरण करण्यात आले.

यावेळी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी प्लास्टिक रस्त्याच्या कामाची माहिती देताना सांगितले की, प्लास्टिक रस्त्याची चाचणी परदेशात यशस्वी झाली आहे. बेळगावात आजपासून या पद्धतीने रस्त्याचे डांबरीकरण सुरू करण्यात आले आहे. भविष्यात ते विभागाकडून करण्याचा विचार सुरू आहे

महापालिकेच्या महापौर व उपमहापौरांकडून तातडीच्या अनुदानाचा गैरव्यवहार झाल्याबाबतची माहिती कानावर आली असून, यावर चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.  प्लास्टिक रस्ते कामाच्या कार्यक्रमात महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, एसपी भीमाशंकर गुळेद, महापालिका सत्तारूढ गटनेते राजशेखर डोणी, नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.

Tags: