बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील बडाल अंकलगी गावात घराची भिंत कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यानंतर विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी घटनास्थळी धाव घेत कुटुंबाचे सांत्वन केले.

बडाल अंकलगी गावात जुनाट घराची भिंत कोसळल्याने चन्नाप्पा कुरबर यांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळताच विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी तहसीलदार बसवराज नागराळ, हिरेबागेवाडी सीपीआय व इतर अधिकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
घटनेची संपूर्ण माहिती मिळताच त्यांनी मृताच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी ग्रामस्थांशी बोलताना चन्नराज हट्टीहोळी यांनी सांगितले की, घराची भिंत कोसळून चन्नाप्पा कुरबर यांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. या कुटुंबाच्या दुखत आपण सहभागी आहोत. या कुटुंबाला सरकारकडून समर्पक भरपाई देण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी बडाल अंकलगी ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments