Belagavi

बेळगाव हुक्केरी मठात 2024 च्या कॅलेंडरचे प्रकाशन

Share

शहरातील लक्ष्मी टेकडी येथील हुक्केरी हिरेमठ या शाखेत बंगळुरू विभूतीपूर संस्थान मठाचे डॉ. महांतलिंग शिवाचार्य स्वामीजींनी , बेळगाव हुक्केरी हिरेमठ यांनी काढलेल्या 2024 च्या कॅलेंडरचे प्रकाशन केले .

यावेळी बोलताना , डॉ. महांतलिंग शिवाचार्य स्वामीजी म्हणाले कि , आम्ही हुक्केरी श्री गुरुशांतेश्वर हिरेमठ यांनी काढलेले 2024 चे कॅलेंडर प्रसिद्ध केले. हुक्केरी हिरेमठ हे धार्मिक, शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करतात. हुक्केरी श्रींनी सर्व शाळांना व विविध संस्थांना सुमारे 10 हजार कॅलेंडर मोफत देऊन त्यांनी आदर्श पूर्ण केला आहे.

अथणी मोटगीमठचे श्री प्रभू चन्नबसव स्वामीजी म्हणाले की, हुक्केरी हिरेमठ हा सर्वांचा आदर करणारा मठ आहे. आज सीमेवर कन्नडसाठी मोठे काम करत आहे. ते म्हणाले की, गावापासून दिल्लीपर्यंत सर्वजण श्रींच्या कामाचे कौतुक करत आहेत.  बेळगाव हुक्केरी हिरेमठचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यावेळी उपस्थित होते. सुनीता निंबर्गी नागलोटीमठ, निशांत स्वामी, महांतेश शास्त्री आदी उपस्थित होते.

Tags: