Belagavi

बेळगावमध्ये श्री मंत्राक्षता वितरण मोहिमेचा शुभारंभ

Share

बेळगावमधील चन्नमा सर्कलमधील श्री गणेश मंदिरात , पूज्य शिवसिद्ध सोमेश्वर स्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत राम मंत्राक्षता वितरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला .

सोमवारी , नवीन वर्षारंभी , श्री राम मंदिर मंत्राक्षता घरोघरी वितरण करण्याच्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला . अयोध्येत २२ जानेवारी रोजी श्री राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे . या निमित्ताने देशभरात , श्री राम मंत्राक्षता वितरित करण्यात येत आहेत . बेळगावमध्ये १ ते १५ जानेवारी दरम्यान या अक्षता घरोघरी वितरित केल्या जाणार आहेत .

आर एस एस जिल्हा कार्यकारणीचे सदस्य , राघवेंद्र कागवाड , जेठा भाई पटेल , डॉ . सुभाष पाटील ,राजेश्वरी संबरगीमठ विश्व हिंदू परिषदेचे प्रांतीय कोषाध्यक्ष कृष्णा भट आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत , ह्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला . खा . मंगल अंगडी तसेच महापौर शोभा सोमनाचे यांनी स्वामीजींकडून मंत्राक्षता स्वीकारल्या .

यावेळी , शिवसिद्ध सोमेश्वर स्वामीजी म्हणाले की, भव्य राममंदिरातील रामाची मूर्ती ही प्रत्येकाच्या मनातील भक्तीचे प्रतिक बनत असून ती भारतवासीयांच्या अभिमानाचे प्रतिक आहे.या कार्यक्रमात प्रत्येक रामभक्ताने सहभागी होऊन , भारताचा अध्यात्मिक इतिहास जगापर्यंत पोचवा असे सांगून त्यांनी आशीर्वाद दिला.

Tags: