बेळगाव तालुक्यातील सुळगा (हिंडलगा) गावात कन्नड ध्वज जाळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.

बेळगावात आज प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले की, आम्ही कर्नाटकात आहोत. जर कोणी कन्नड ध्वज जाळला तर ते दुष्कृत्य आहे. दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल.

नंदीहळ्ळी कन्नड शाळेतील मुलांवर होत असलेल्या भेदभावाच्या मुद्द्यावर मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सडेतोड प्रतिक्रिया दिली. माझ्या ऐवजी तुम्हालाच माझा मतदारसंघ माहित आहे का?, नंदीहळ्ळी हे 90% माझे गाव आहे. मी तेथील घराघरातील लोकांना नावाने हाक मारते. एकदाही लोकांनी मला याबद्दल सांगितले नाही. तुम्ही नवीन बातम्या सांगत आहात. असा भेदभाव कुठेही होत नाही. माझ्या मतदारसंघात मराठी शाळांमध्ये मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. मराठी पालक आपल्या मुलांना कन्नड माध्यमांच्या शाळांमध्ये पाठवत आहेत, असे त्यांनी सांगितले.


Recent Comments