नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आज बेळगाव उत्तर विभागाचे आयजीपी विकास कुमार यांनी उत्तर विभाग पोलीस दलातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या

दरवर्षी एक जानेवारीला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्याची प्रथा पोलीस दलात ब्रिटिशांच्या काळापासून सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज बेळगावात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम पार पडला.
बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आज, सोमवारी सकाळी नवीन वर्षाच्या शुभेच्छा विनिमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एसपी भीमाशंकर गुळेद यांनी उत्तर विभागाचे आयजीपी विकास कुमार यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

त्याशिवाय अतिरिक्त पोलीस अधीक्षक वेणुगोपाल, लोकायुक्त एसपी महानंद नंदगावी, उत्तर विभागातील जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, डीसीपी, एसीपी, सीपीआय, पीएसआय आणि कार्यालयातील निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी आयजीपी विकास कुमार यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी उत्तर विभागातील पोलीस अधिकारी, कर्मचारी गणवेशाऐवजी साध्या वेशभूषेत उपस्थित होते.


Recent Comments