Belagavi

भीमा कोरेगाव उत्सव बेळगावात मोठ्या प्रमाणावर होणार साजरा

Share

भीमा कोरेगाव उत्सव बेळगावात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे . या निमित्ताने धर्मवीर संभाजी सर्कलपासून बाईक रॅली काढण्यात येणार असून , डॉ . आंबेडकर उद्यानात होणाऱ्या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या समाजातील मान्यवरांचा सत्कार केला जाणार आहे अशी माहिती दलित नेते मल्लेश चौगुले यांनी दिली .

यासंबंधी इन न्यूजला माहिती देताना दलित नेते मल्लेश चौगुले म्हणाले कि, या वर्षी आम्ही भीमा कोरेगाव उत्सव बेळगावात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणार आहे . सर्व दलित संघटना मिळून हा कार्यक्रम करणार आहोत . उद्या सकाळी दहा वाजता धर्मवीर संभाजी सर्कलपासून बाईक रॅली काढण्यात येणार आहे . हे बीके रॅली , दरवर्षीप्रमाणे , किर्लोस्कर रोड ,रामदेव गल्ली , काकतीवेस , चन्नमा सर्कलमार्गे , डॉ . बाबासाहेब आंबेडकर उद्यानात रॅलीची सांगता होणार आहे . त्या ठिकाणी , होणाऱ्या कार्यक्रमात समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार केला जाणार आहे . त्याचप्रमाणे के डी मंत्रेशी यांचे भीमा कोरेगाव इतिहासाबद्दल व्याख्यान होणार आहे . सर्व संघटनांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन दलित नेते मल्लेश चौगुले यांनी

डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा अंगीकारून , समाजातील तरुणांनी पुढे जावे असे ते म्हणाले .

Tags: