बेळगाव रेल्वे स्थानकावर जास्तीत जास्त लोकांना आकर्षित करण्यासाठी चक्क रेल्वेच्या बोगीमध्ये हॉटेल सुरू करण्यात आले आहे.
आज नवनिर्मित मॅग्नेस हॉटेलचे उद्घाटन बेळगावच्या खासदार मंगल अंगडी, आमदार राजू सेठ यांच्या हस्ते करण्यात आले.
मध्य रेल्वे विभागाने सर्व जुन्या रेल्वे स्थानकांचे
नूतनीकरण करून ती नवीन आधुनिक स्थानकात परावर्तित केली असून सर्व रेल्वे स्थानकांसमोर रिकाम्या रेल्वे बोगी टाकून त्यात हॉटेल्स सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मालक तनिष कुगजी व अश्वगंधा कुगजी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

स्टेशन मास्तर अनिल कुमार, प्रसाद कुलकर्णी आदी उपस्थित होते. आता उत्तम चवदार पदार्थ चाखण्यासाठी आजच बेळगावला भेट द्या


Recent Comments