विजयपूर जिल्ह्यातील चडचण नगरपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. चडचन नगर पंचायतीच्या 16 जागांसाठी आज मतमोजणी झाली असून भाजपने 8, काँग्रेस 4 तर अपक्षांनी 4 जागा जिंकल्या आहेत.
मुद्देबिहाळ नगरपालिकेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. मुद्देबिहाळ नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 साठी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे. तसेच बसवनबागेवाडी तालुक्यातील मनगुळी नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 7 च्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. प्रभाग क्रमांक सातसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे.


Recent Comments