Belagavi

बेळगावात संघाचे नेते भट यांच्या वक्तव्याचा निषेध

Share

आरएसएस नेते कल्लडका प्रभाकर भट्ट यांनी मुस्लिम महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे तीव्र पडसाद बेळगावात आज उमटले. कर्नाटक राज्य मानवी हक्क संघटनेच्या अध्यक्षा आयेशा गौस सनदी यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी आज निदर्शने करून या प्रकरणी भट्ट यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना आयेशा गौस सनदी म्हणाल्या की, श्रीरंगपट्टण येथे झालेल्या एका परिषदेत कल्लडका प्रभाकर भट्ट यांनी मुस्लिम महिला, मुलींबाबत केलेले वक्तव्य आक्षेपार्ह व निषेधार्ह आहे. हे वक्तव्य करून त्यांनी इस्लामचा अवमान करून, धर्मभेदाचे विषारी बीज पेरून समाजात अशांतता निर्माण करण्याचे काम केले आहे. कर्नाटकात शांततापूर्ण वातावरण असून, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्यांना कर्नाटकातून हद्दपार करावे, अशी मागणी त्यांनी केली.

कस्तुरी कोलकार बोलताना म्हणाल्या की, कल्लडका प्रभाकर भट यांनी मुस्लिम महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान करून केवळ उलिं महिलांचाच नव्हे तर संपूर्ण स्त्री कुळाचा अपमान केला आहे. जातींमध्ये विषाची बीजे पेरणे चुकीचे आहे. यामध्ये महिलांना आणून त्यांच्याविषयी असे बोलणे चुकीचे आहे. याबद्दल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

Tags: