गृहलक्ष्मी योजनेतील तांत्रिक अडचणी, त्रुटी दूर करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाने आजपासून तीन दिवस राज्यात शिबिराचे आयोजन केले आहे. विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी हलगा येथे विशेष शिबिराचे उदघाटन आज केले.
गृहलक्ष्मी योजनेतील तांत्रिक समस्या, बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक करणे, नवीन बँक खाती उघडणे, ई-केवायसी अपडेट, गृहलक्ष्मी अर्जांची स्थिती या संदर्भातील तक्रारींच्या निवारणासाठी हलगा येथे आयोजित विशेष शिबिराचे उदघाटन मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले.
गृहलक्ष्मी योजनेच्या शिबिराचे उद्घाटन केल्यानंतर मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बँक संबंधित समस्या, बँक खात्यांशी आधार क्रमांक लिंक करणे, नवीन बँक खाती उघडणे, ई-केवायसी अपडेट, गृहलक्ष्मी अर्जाची स्थिती तपासणे आदी विषयांवर भाष्य केले. सर्वांनी याचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी लाभार्थी महिलांना केले.
महिला व बालकल्याण विभागाच्या प्रभारी उपसंचालक रेवती म्हणाल्या की, लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पाठीशी आम्ही सदैव उभे असून आम्ही त्यांची पाठ सोडणार नाही. आम्हाला गृहलक्ष्मी योजनेतून महिलांचे औषध व इतर खर्चाच्या रकमेची तरतूद करून द्यायची आहे. गृहलक्ष्मी योजना यशस्वी करण्यासाठी आमचा विभाग सरकारच्या निर्देशानुसार काम करत आहेत. कोणत्याही अडचणींच्या निवारणासाठी लाभार्थी महिलांनी खात्याशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.
शिबिरात हलगा व परिसरातील गावातील महिलांनी उपस्थित राहून आपल्या अडचणी मांडल्या. त्यांचे अधिकाऱ्यांनी निवारण केले. यावेळी महिला बाल विभागाच्या प्रभारी उपसंचालक रेवती, सीडीपीओ सुमित्रा डीबी, ललिता पर्वतम्मनवर, लक्ष्मी राजू गजपती आदी उपस्थित होते.


Recent Comments