बसुर्ते गावच्या सर्व मागण्यांचा विचार करून प्राधान्याने विकासकामांची अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बसुर्ते ग्रामस्थांना दिले.

बसुर्ते ग्रामस्थांच्या वतीने महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा मंगळवारी सायंकाळी नागरी सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बसुर्ते गावच्या सर्व मागण्यांचा विचार करून प्राधान्याने विकासकामांची अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले. मी राज्याची मंत्री आहे, पण त्याआधी मी तुमच्या घरची मुलगी आहे. घरची मुलगी म्हणून मला माझ्या कर्तव्याची जाणीव आहे. तुमच्यामुळेच मी या पदापर्यंत पोहोचू शकले. त्यामुळे तुमचे कर्ज फेडण्यास विलंब होणार नाही, अशी ग्वाही हेब्बाळकर यांनी दिली.
यावेळी गावातील ज्येष्ठ नेते युवराज कदम, बसवंत बेनके, संजय गोजगेकर, रमेश गुमटे, कृष्णा पाटील, उमेश नाईक, राजू भंडागे, रघुनाथ खांडेकर, सुरेखा केसरकर, संगिता नाईक, लक्ष्मण डोंगरे, शिवाजी नाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments