बेळगाव शहरासह जिल्हाभरात ख्रिसमस जल्लोषाची धामधूम उडाली आहे. चर्च, ख्रिश्चन शिक्षण मंडळे विद्युत रोषणाईमुळे चमकत आहेत आणि ख्रिस्ती बांधव हा सण उत्साहात साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

बेळगाव जिल्ह्यात 100 हून अधिक चर्च आहेत. फातिमा कॅथेड्रल चर्च, सेंट मेरी चर्च, सेंट्रल मेथॉडिस्ट चर्च, सेंट अँथनी चर्च, बेलगाम चर्चसह शहरातील विविध चर्चमध्ये या उत्सवाची सुरुवात झाली आहे. ख्रिसमस सण 24 डिसेंबरच्या संध्याकाळी आणि 25 डिसेंबर रोजी साजरा केला जाईल. ‘येशू’च्या जन्माचे चित्रण करणारी ‘मॉडेल्स, आकर्षक ‘ख्रिसमस ट्री’ , बेल्स , ख्रिसमस गिफ्ट्स लोकांना आकर्षित करत आहेत.
इन न्यूजशी बोलताना एक ख्रिश्चन महिलेने सांगितले कि , हा ख्रिश्चनांचा मुख्य सण आहे. त्यामुळे आम्ही केवळ चर्चमध्येच नव्हे तर घरांमध्येही ख्रिसमस ट्री बांधतो. बायबल वाचण्यासोबतच आम्ही एकत्र प्रार्थना करतो. आपण देवाच्या पूजेसाठी जास्त वेळ घालवतो. आम्ही मित्रांसोबत केक आणि गोड पदार्थ वाटून , आनंद साजरा करू,’ या सणाबद्दल त्यांनी इन न्यूजशी आनंद व्यक्त केला
विविध चर्चमध्ये नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्याची तयारी आतापासूनच सुरू आहे. 31 डिसेंबरच्या रात्री विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे .


Recent Comments