भाषिक समरसतेचे दर्शन घडविणारे कन्नड संमेलन कारदगा गावातील डी. एस. नाडगे युनायटेड ग्रॅज्युएट युनिव्हर्सिटीच्या प्रांगणात ७ जानेवारीला होणार आहे, असे संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणारे बेळगावातील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सर्जू काटकर यांनी सांगितले.
बेळगावात कारदगा कन्नड बळगच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सर्जू काटकर म्हणाले की, कारदगा हे कर्नाटक आणि महाराष्ट्राला एकत्र आणणारे शहर आहे. कन्नड आणि मराठी व भाषक, सर्व जातीचे लोक येथे एकोप्याने राहतात. येथे आतापर्यंत भाषेच्या मुद्द्यावरून दंगल किंवा वाद झालेला नाही. या गावात शांततापूर्ण वातावरण आहे. या परिसरात एक मराठी साहित्य संमेलन भरते आणि त्यात सर्व कन्नडीगांचा सहभाग असतो. त्या भागातील तमाम मराठी लोक कन्नड साहित्य संमेलनाला येणार आहेत. हे कन्नड संमेलन अल्लम प्रभू महास्वामी यांचे स्वप्न आहे. अल्लम प्रभु महास्वामी यांनी 8 वर्षांपूर्वी कारदगा येथील कन्नड वातावरण विकसित करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले होते. पहिल्या कन्नड संमेलनाचे अध्यक्ष पाटील पुट्टप्पा होते.
कारदगा कन्नड बळगचे मानद अध्यक्ष राजुकुमार खिचडे म्हणाले की, ७ जानेवारी २०२४ रोजी बेळगावचे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सरजू काटकर यांच्या अध्यक्षतेखाली ६वे कन्नड साहित्य संमेलन कारदगा येथे होत आहे. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते सकाळी १०.३० वाजता उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाला विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी, आमदार शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार गणेश हुक्केरी, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, उत्तम पाटील उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर कवी मैफल, साहित्यिक सत्र व सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. कन्नड आणि मराठी माणसांचे एकोप्याने संमेलन होणार आहे.
यावेळी कारदगा कन्नड बळगचे अध्यक्ष संजय गावडे, उपाध्यक्ष बाळू नवनाळे, शकुंतला कामते, सचिव माणिक चंदगडे, समन्वयक किरण सदलगे आदी उपस्थित होते.


Recent Comments