हुक्केरी तालुक्यातील अंकली येथे शाळेजवळ कन्नड ध्वज लावण्यास प्रतिबंध करून मारहाण केल्याच्या कथित घटनेप्रकरणी हल्लेखोरांना अटक करण्याच्या मागणीसाठी कर्नाटक रक्षण वेदिके आणि संकेश्वर राज्योत्सव समितीच्या वतीने आज निदर्शने करून जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.
अंकली येथे शाळेजवळ कन्नड ध्वज लावणाऱ्या युवकांना आक्षेप घेऊन काहींनी हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, आणखी आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी कर्नाटक रक्षण वेदिके आणि संकेश्वर राज्योत्सव समितीच्या वतीने आज निदर्शने करून जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.
या
वेळी बोलताना कन्नड आंदोलक महादेव तळवार यांनी सांगितले की, या प्रकरणी केवळ एकालाच अटक झाली असून, बाकीचे आरोपी मोकाट आहेत. कर्नाटकात कन्नडला, कन्नड ध्वजाला विरोध करणे चुकीचे आहे. त्यामुळे असा विरोध करण्याऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे. तसेच या प्रकरणातील अन्य आरोपींनाही लवकर अटक करावी अशी मागणी त्यांनी केली. बाईट.
यावेळी निवेदन स्वीकारून बोलताना एसपी डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी, संबंधितांना लवकरच अटक करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी दिलीप होसमनी, संतोष पाटील, गणेश रोकडे, राहुल सैकन्नावर, विजय जिरली, विशाल चुळकी यांच्यासह कर्नाटक रक्षण वेदिके आणि संकेश्वर राज्योत्सव समितीचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.


Recent Comments