Belagavi

आदित्य पाटील याची राष्ट्रीय खोखो स्पर्धेसाठी निवड

Share

बेळगावातील साधना क्रीडा संघाचा खेळाडू आदित्य नारायण पाटील याची राष्ट्रीय खोखो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

बेळगावातील नावाजलेल्या सुळगे (हिंडलगा) येथील साधना क्रीडा संघाचा खेळाडू आदित्य नारायण पाटील याची ४२व्या राष्ट्रीय खोखो स्पर्धेसाठी कर्नाटक संघात निवड झाली आहे.

छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे २६ ते ३० डिसेंबर दरम्यान होणाऱ्या स्पर्धेसाठी आदित्य कर्नाटक संघातून खेळणार आहे.

Tags: