हुक्केरी तालुक्यातील अंकली येथील कन्नड ध्वज हटवण्याची धमकी देणाऱ्या तसेच कन्नडीगांवर हल्ला करणाऱ्याना तात्काळ अटक करण्याची मागणी करत कर्नाटक रक्षण वेदिकेच्या प्रवीण शेट्टी गटातर्फे निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
हुक्केरी तालुक्यातील अंकली येथे लावलेला कन्नड ध्वज काढून टाकण्याची धमकी देऊन कन्नडीगांवर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांना अटक न केल्याच्या निषेधार्थ कर्नाटक रक्षण वेदिकेच्या प्रवीण शेट्टी गटातर्फे चेन्नम्मा सर्कल येथे आंदोलन केले.
यावेळी बोलताना कर्नाटक रक्षण वेदिकेच्या प्रवीण शेट्टी गटाचे जिल्हाध्यक्ष आर. अभिलाष यांनी सांगितले की, हुक्केरी तालुक्यातील अंकली येथील कन्नड ध्वज काढून टाकण्याची धमकी देऊन कन्नडीगांवर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांना अटक करावी, अशी मागणी केली.
जिल्ह्यातील तरुणांनी रोजगाराच्या शोधात बेंगळुरू आणि पुणे शहरात जाणे टाळावे यासाठी बेळगावात आयटी-बीटी कंपन्या स्थापन करण्यात याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. बाइट
बेळगावच्या प्रसिद्ध विश्वेश्वरय्या टेक्निकल युनिव्हर्सिटीमध्ये अनेक गैरप्रकार होत आहेत, त्याची सखोल चौकशी करावी, अधिकाऱ्यांवर सीबीआय चौकशी करावी, आमच्या तीन मागण्यांना प्रतिसाद द्यावा, असे त्यांनी सांगितले.


Recent Comments