Belagavi

बेळगाव वकील संघातर्फे मुख्यमंत्र्यांचे कायदा सल्लागार पोनण्णा यांचा सत्कार

Share

वकील संरक्षण कायदा लागू करण्यात महत्वाची भूमिका बजावल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे विधी सल्लागार आमदार ज्येष्ठ अधिवक्ता ए. एस. पोनण्णा आणि बेंगळुरू बार असोसिएशनचे अध्यक्ष विवेक सुभारेड्डी यांचा बेळगाव वकील संघटनेच्या वतीने ऍड. सुधीर चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कर्नाटक विधिमंडळात 15 डिसेंबर 2023 रोजी कायद्याद्वारे वकिलांचे हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी एक विधेयक मंजूर केले. दोन्ही सभागृहांनी हे विधेयक मंजूर केले. हे विधेयक मंजूर करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे मुख्यमंत्र्यांचे कायदा सल्लागार ज्येष्ठ वकील आमदार ए. एस. पोनण्णा यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांचे कायदेशीर सल्लागार आमदार ज्येष्ठ वकील ए.एस. पोनण्णा म्हणाले की, कर्नाटक विधानसभेने गुरुवारी वकील संरक्षण विधेयक-2023 मंजूर केले. 11 डिसेंबर 2023 रोजी कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच के पाटील यांनी सादर केलेल्या या विधेयकाचा उद्देश वकिलांना प्रतिस्पर्धी पक्षांकडून होणार्‍या दुर्भावनापूर्ण आणि फालतू कायदेशीर कारवाईपासून संरक्षण देणे आहे. हे विधेयक गुन्ह्यांचे प्रतिबंध आणि गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी आठव्या युनायटेड नेशन्स काँग्रेसने स्वीकारलेल्या “वकिलांच्या भूमिकेची मूलभूत तत्त्वे” यावर आधारित आहे. वकिलांना भीती, अडथळा, छळवणूक किंवा अवाजवी हस्तक्षेप न करता त्यांची व्यावसायिक कर्तव्ये पार पाडता यावीत याची खात्री करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

यावेळी विवेक सुभारेड्डी यांचेही भाषण झाले. जीएस पाटील, सचिन शिवन्नावर यांच्यासह अनेक वकील या कार्यक्रमात उपस्थित होते.

Tags: