Belagavi

आ. राजू सेठ यांनी विधानसभेत उपस्थित केला सरकारी शाळांचा मुद्दा

Share

बेळगाव उत्तर मतदार संघाचे आ. आसिफ उर्फ राजू सेठ यांनी विधानसभेत आज मतदारसंघातील सरकारी शाळांच्या दुरवस्थेबाबत प्रश्न उपस्थित करून सरकारने त्यांची सुधारणा करण्याची मागणी केली.

विधिमंडळ अधिवेशनात आज विधानसभेत दुपारच्या सत्रात बोलताना आ. राजू सेठ यांनी बेळगाव उत्तर मतदार संघातील सरकारी शाळांच्या दुरवस्थेचा मुद्दा मांडला. अनेक शाळांमध्ये पाणी, स्वच्छतागृहांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

यावर प्राथमिक शिक्षण मंत्र्यांच्या वतीने उत्तर देताना उच्च शिक्षणमंत्री एम. सी. सुधाकर यांनी, राज्य सरकारने सर्व सरकारी शाळांना सुविधा देण्यासाठी पावले उचलली असून, टप्प्याटप्प्याने सर्व आवश्यक मूलभूत सुविधा पुरविण्यात येतील असे उत्तर दिले.

 

Tags: