Belagavi

विविध मागण्यांच्या पूर्ततेच्या मागणीसाठी हडपद समाजाचे आंदोलन

Share

हडपद आप्पाण्णा समाज सेवा संघाच्या वतीने विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी साठी बेळगाव येथील सुवर्णसौधजवळ आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेळगावातील सुवर्णसौधजवळ हडपद समाजाच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

हडपद समाजाच्या विकासासाठी महामंडळ स्थापन करण्यात यावे , हडपद अप्पाण्णा समिती स्थापन करावी आणि बंगळुरूमध्ये गरीब मुलांना शाळा , महाविद्यालय, वसतिगृह व समुदाय भवन सुरू करण्यासाठी 05 एकर जमीन द्यावी, असे हडपद अप्पाण्णा समाज सेवा संघाचे नेते म्हणाले..गेली २-३ वर्षे एकाच ठिकाणी आंदोलन करूनही आम्हाला न्याय मिळाला नाही .यावेळी न्याय मिळावा असे हडपद अप्पाण्णा समाज सेवा संघाचे नेत्यांनी सांगितले .

यावेळी हडपद समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Tags: