मोफत आरोग्य सेवा देण्याच्या मागणीसाठी सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटक या संघटनेतर्फे आज सुवर्णसौधसोर जोरदार आंदोलन करण्यात आले.
सरकारने जनतेला मोफत आणि दर्जेदार आरोग्यसेवा पुरवायला हवी. त्याचप्रमाणे सरकारी रुग्णालयांच्या सुधारणेबरोबरच तेथील फार्मसीमध्ये सर्व औषधे उपलब्ध झाली पाहिजेत. अशी मागणी करत या संघटनेतर्फे सुवर्णसौध परिसरात निदर्शने करण्यात आली.
सार्वत्रिक आरोग्य आंदोलन संघटनेच्या आंदोलकांनी याबाबत बोलतांना सांगितले की, आरोग्य हा आमचा हक्क आहे, राज्य सरकारने २४ तास सरकारी रुग्णालये सुरू करावीत, एचआयव्ही रुग्णांना दर्जेदार पौष्टिक आहार द्यावा, सर्व आजारांवर मोफत औषधे उपलब्ध करून द्यावीत. या आंदोलनात 250 हून अधिक लोक सहभागी झाले आहेत.
आंदोलक मंजम्मा म्हणाल्या की, सरकारने जनतेला मोफत आणि दर्जेदार आरोग्यसेवा पुरवायला हवी. त्यामुळे सरकारी रुग्णालयांच्या सुधारणेबरोबरच तेथील फार्मसीमध्ये सर्व औषधे उपलब्ध झाली पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. बाइट
या आंदोलनात 250 हून अधिक लोक सहभागी झाले होते.


Recent Comments